🕒 1 min read
पुणे – पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तब्बल सात दिवस फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हगवणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माझा नवरा दोषी नाही, तरी नाव घेतलं! – मयुरी हगवणे
“या प्रकरणात जो खरोखर दोषी आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी,” अशी अपेक्षा मयुरी हगवणे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, “माझ्या नवऱ्याला या प्रकरणात जबरदस्तीने गोवण्यात आलं आहे. त्याचा या संपूर्ण प्रकाराशी काहीही संबंध नव्हता. माझा संसारही वेगळा होता,” असं म्हणत त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली.
Mayuri Hagavane Says Timely Police Action Could Have Saved Vaishnavi
तसेच, “मी जर तिथे राहत असते, तर माझंही नाव या लोकांनी टाकलं असतं,” अशी खळबळजनक टिप्पणीही त्यांनी केली. “जेव्हा मी हगवणे कुटुंबाविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती, त्याचवेळी योग्य ती कारवाई झाली असती, तर आज वैष्णवी आपल्यात असती,” असा गंभीर आरोपही मयुरी हगवणे यांनी केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पिस्तूल, धमक्या आणि अश्लील व्हिडिओ! निलेश चव्हाणचा काळा इतिहास वाचा
- ‘पहिल्याच दिवशी सुमोटो घेतलं!’; राजेंद्र हगवणेच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर यांचं ट्विट चर्चेत
- वैष्णवी प्रकरणात मकोका लागणार का?; फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








