पुणे: पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI Suicide Case) टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
संबंधित पोलीस उपनिरीक्षक हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
पुणे पोलीस दलात खळबळ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
या पोलीस अधिकाऱ्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे मूळ कारण अद्याप समजू शकलेले नाही. कौटुंबिक वाद, कामाचा ताण की अन्य काही वैयक्तिक कारण, या सर्व अंगांनी पोलीस सध्या तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीमकडूनही घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, एका सहकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने पोलीस दलात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण: युक्तिवादासाठी नीरज कौल यांची सुप्रीम कोर्टाकडे दोन दिवसांची मागणी
- सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हावर सुनावणी; पक्षघटनेवरून शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद
- “एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, मी दादांसारखी नाही”; सुनेत्रा पवारांचा जगतापांना थेट इशारा
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









