🕒 1 min read
प्रतिनिधी – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) यांनी शिवराज्याभिषेक सोहळा ६ जूनला साजरा न करता, तो तिथीप्रमाणे म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला साजरा करण्याची मागणी केली आहे. ब्रिटिशांच्या काळातील तारखेच्या प्रथांनुसार उत्सव साजरे करणं चुकीचं असून, आपल्या संस्कृतीनुसार तिथीला प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
Shivrajyabhishek Should Follow Tithi, Not Date: Sambhaji Bhide
याचसोबत रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीला हटवू नये, अशी मागणीही त्यांनी पुन्हा मांडली. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी राजे यांनी या शिल्प हटवण्याची मागणी केली होती, ज्याला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबाही मिळाला होता. मात्र, भिडे यांनी याला तीव्र विरोध केला होता. वाघ्या कुत्र्याच्या इतिहासावर मतभेद असले तरी या समाधीचं ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व लक्षात घेऊन ती राखून ठेवावी, असं भिडे यांचं म्हणणं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पोलिसांनी वेळीच कारवाई झाली असती, तर वैष्णवी आज जिवंत असती; मयुरी हगवणेचा मोठा आरोप!
- पिस्तूल, धमक्या आणि अश्लील व्हिडिओ! निलेश चव्हाणचा काळा इतिहास वाचा
- ‘पहिल्याच दिवशी सुमोटो घेतलं!’; राजेंद्र हगवणेच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर यांचं ट्विट चर्चेत