🕒 1 min read
सांगली | १६ एप्रिल २०२५
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना सांगली शहरातील माळी गल्ली येथे भटक्या कुत्रीने चावा घेतल्यानंतर महापालिका प्रशासन सक्रीय झालं आहे. घटनेनंतर सकाळपासून महापालिकेच्या डॉग व्हॅनमार्फत कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात येत असून, आतापर्यंत अनेक भटके कुत्रे पकडण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुत्रीला चार पिल्लं असून, भिडे गुरुजी जेव्हा त्या परिसरातून जात होते, तेव्हा कुत्रीला तिच्यावर भिडे यांच्याकडून हल्ला होतोय असा समज झाला होता. कुत्रीने स्वसंरक्षणात भिडेंच्या डाव्या पायावर चावा घेतला. भिडे यांच्यावर तात्काळ सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
Sambhaji Bhide Bitten by Female Dog in Sangli
या घटनेनंतर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. याआधी अनेक वेळा नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले झाले असूनही, महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर राजकीय क्षेत्रातही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपरोधिक टोला लगावत म्हटले, “काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली, कुणाला चावावं कळलं नाही याचं वाईट वाटतं. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक प्राण्याने का राग धरला याची एसआयटी चौकशी केली पाहिजे”
महत्वाच्या बातम्या
- ‘कुत्री एकनिष्ठ असतात’ म्हणणाऱ्या Sambhaji Bhide यांना कुत्र्याचा चावा!
- “ठाकरे गटाला सत्तेत यायचंय, पण घेत नाहीत”; Chandrakant Patil यांचा घणाघात
- Fact Check – लता मंगेशकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर भीमगीत गाण्यास नकार दिला?









