🕒 1 min read
पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाने मोठी कारवाई करत अंदाजे १० कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात बँकॉकहून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, चौकशीत मिळालेल्या माहितीवरून मुंबईतील एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.
डीआरआयच्या मुंबई पथकाला बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांकडे अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे विमानतळावर सोमवारी ही कारवाई करण्यात आली. प्रवाशांच्या सामानाची तपासणी करताना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हायड्रोपोनिक गांजाचे पॅकेट्स आढळून आले. चौकशी दरम्यान त्यांनी कबूल केलं की हे गांजा मुंबईतील एका व्यक्तीकडे सुपूर्त करण्यात येणार होतं.
₹10 Crore Hydroponic Ganja Seized at Pune Airport
पुढील तपासात डीआरआयच्या पथकाने मुंबईतून संबंधित व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडूनही गांजाची जप्ती करण्यात आली आहे. एकूण १० किलो गांजा या प्रकरणात सापडला असून आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे १० कोटी रुपये असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- मोदींना आता कळालं असेल, पाकिस्तानसोबत युद्ध करणं किती महागात पडतं – शाहीद आफ्रिदी
- ‘प्लेयर्स के साथ गंदी बातें करनी चाहिए’, रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल
- आधी माफी मागा, मगच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा – अमोल मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now