Share

साईबाबांच्या शिर्डीत धक्कादायक घटना, सव्वातीन कोटीचं सोनं घेऊन ड्रायव्हर पसार

Driver escapes from Shirdi hotel with ₹3.26 crore worth of gold and cash, shocking theft reported.

Published On: 

Driver escapes from Shirdi hotel with ₹3.26 crore worth of gold and cash, shocking theft reported.

🕒 1 min read

शिर्डी – साईबाबांच्या शिर्डीमध्ये तब्बल 3 कोटी 26 लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन ड्रायव्हर फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी एका हॉटेलमधील रूममध्ये घडली असून, गुजरातमधील सोन्याचे व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी (वय 35) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ही घटना 14 मे रोजी सकाळी उघडकीस आली. खिशी हे 7 मे रोजी मुंबईहून सोन्याचे जवळपास 4.8 किलो दागिने घेऊन शिर्डी येथे आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि संशयित चालक सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित (रा. राजस्थान) उपस्थित होते. हे तिघे हॉटेल साई सुनीता येथील रूम क्रमांक 201 मध्ये थांबले होते.

Shirdi Theft: Driver Runs Away with ₹3.26 Crore Gold and Cash

13 मेच्या रात्री, जेवण करून तिघेही एकाच खोलीत झोपले. सोन्याची बॅग त्यांनी बेड आणि टेबलच्या मध्ये ठेवली होती. 14 मे रोजी सकाळी, खिशी यांचा भाऊ पैसे घेण्यासाठी आल्यानंतर लक्षात आलं की दरवाजा उघडाच आहे, आणि ड्रायव्हर गायब आहे.

ड्रायव्हरचा मोबाईल व कपडे रूममध्येच होते, पण तो स्वतः कुठेच दिसला नाही. बॅग तपासली असता त्यातलं 3.5 किलो सोनं आणि 4 लाखांची रोकड गायब असल्याचं स्पष्ट झालं.

या प्रकरणी सुरेश राजपुरोहित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच कामावर रुजू झाला होता. खिशी यांनी सांगितलं की त्याच्यावर विश्वास ठेवला, मात्र त्यानेच विश्वासघात केला. सध्या शिर्डी पोलिसांकडून ड्रायव्हरचा शोध सुरू असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Crime India Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या