🕒 1 min read
नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील अपमानास्पद वक्तव्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने भाजप मंत्री विजय शाह यांना चांगलंच सुनावलं आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई (CJI B.R. Gavai) यांनी मंत्री शाह यांच्यावर टीका करत “संविधानिक पदावर असलेली व्यक्ती असे वक्तव्य करूच कशी शकते?” असा थेट सवाल केला.
मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात बोलताना मंत्री विजय शाह यांनी कर्नल कुरेशींना ‘दहशतवाद्यांची बहीण’ अशी संतापजनक टिप्पणी केली होती. या वक्तव्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने FIR दाखल करण्याचे आदेश दिले होते. FIR नोंदवण्यात आल्यानंतर, विजय शाह यांनी या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु त्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.
CJI BR Gavai Rejects Vijay Shah’s Plea
सरन्यायाधीश गवई यांनी सुनावणीदरम्यान “तुम्ही कोण आहात, तुम्हाला माहिती आहे का?” असा खरमरीत सवाल करत, “संविधानिक पदावरील व्यक्ती अशा प्रकारची विधाने करू शकत नाही”, असे स्पष्ट केले. शाह यांच्या वकिलांनी माफीनामा दिल्याचा दावा केला आणि माध्यमांनी विधानाचा गैरवापर केल्याचा युक्तिवाद केला. मात्र सरन्यायाधीशांनी स्पष्टपणे “आपण उच्च न्यायालयात का गेला नाहीत?” असा प्रतिप्रश्न केला आणि FIR स्थगिती देण्यास नकार दिला.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींनी विजय शाह यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. सोशल मीडियावर वाद चिघळत असल्याचे पाहून विजय शाह यांनी माफीनामा जारी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश; नवीन खंडपीठ स्थापन करून जलद सुनावणीचे आदेश
- फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानून गावागावात जत्रा भरवावी – संजय राऊत
- साईबाबांच्या शिर्डीत धक्कादायक घटना, सव्वातीन कोटीचं सोनं घेऊन ड्रायव्हर पसार