Rahul Gandhi । संपूर्ण देशाचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) आज 395 वी जयंती ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी एक ट्विट केले आहे.
त्या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी या ट्वीटमध्ये शिवजयंतीनिमित्ताने शुभेच्छा देण्याऐवजी श्रद्धांजली अर्पण केली आहे. भाजपने (BJP) त्यावर आक्षेप घेतला असून राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.
Rahul Gandhi post on X
राहुल गांधी X वर लिहितात, “छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं। अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी। उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा,” अशा आशयाचे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.
Atul Bhatkhalkar on Rahul Gandhi
“महाराष्ट्रातील नागरिकांचा हा अपमान आहे, जयंतीच्या दिवशी आदरांजली अर्पण करतात. राहुल गांधी हे महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत कळत-नकळत अपमान करत असून त्यांनी हे ट्वीट मागे घ्यावे,” अशी मागणी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :