Share

“धनंजय मुंडे भ्रष्टाचारी, त्यांचा राजीनामा घेतला तरच सरकारची…”; Vijay Vadettiwar यांची जहरी टीका

by MHD
Vijay Vadettiwar criticizes state government over the resignation of Dhananjay Munde

Vijay Vadettiwar । अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. दिवसेंदिवस या प्रकरणामुळे मुंडेंच्या अडचणीत भर पडत चालली आहे. अशातच आता पुन्हा एकदा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यंमाशी संवाद साधताना धनंजय मुंडे आणि सरकारवर निशाणा साधला आहे.

“धनंजय मुंडे भ्रष्टाचारी आहेत. जर त्यांना मंत्रिपदावरून काढले तरच सरकारची प्रतिष्ठा राहील. नाहीतर असलेली ही इज्जत घालवून बसतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे भ्रष्टाचाऱ्यांचं सरकार आहे, असा संदेश जाईल,” असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, “धनंजय मुंडे यांच्यावर किती आरोप झाले आहेत, हे यांना थोडं तरी समजलं पाहिजे. त्यांच्यावर आधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मग त्यांचे सहकारी खुनात सापडतात. असे होऊनदेखील धनंजय मुंडे मंत्री मंत्रिमंडळात कायम आहे. त्यामुळे सरकार हे बेशरमाचे झाड झाले आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

Vijay Vadettiwar on Dhananjay Munde

दरम्यान, कापूस, सोयाबीन, तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या बळकटीकरण योजनेच्या खरेदीत जवळपास तब्बल 275 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला होता. यावरून आता विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Vijay Vadettiwar । अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. दिवसेंदिवस या …

पुढे वाचा

Marathi News Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now