Ladki Bahin Yojana । राज्यातल्या महायुती सरकारला निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) चांगला फायदा झाला. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात, पण आता याच महिलांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे.
लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) घरात चारचाकी असणे महागात पडणार आहे. कारण अनेक जिल्ह्यांमध्ये या योजनेची पडताळणी (Verification Updates) सुरू झाली आहे. पुढील आठवड्यापासून पुण्यात पडताळणी सुरू होणार असून ज्या लाभार्थी महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे, असे निष्पन्न झाले तर त्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात येणार आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत जिल्ह्यातील 75 हजार बहिणींच्या घरात चारचाकी गाड्या सापडल्या आहेत. या योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांनाच मिळाला पाहिजे आणि पात्र महिलांना दर महिन्याला 2100 रुपयांची अंमलबजावणी करत असताना याचा ताण सरकारी तिजोरीवर पडू नये, यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojana Verification Updates
ही योजना सुरु केली तेव्हा या योजनेसाठी जे काही निकष दिले होते. पण सरकारने प्राप्त झालेल्या अर्जांची कोणतीही तपासणी न करता सरसकट महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. आता सरकारने अर्ज तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- धक्कादायक! Santosh Deshmukh हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहिल्याने कृष्णा आंधळेच्या मित्रांनी केली तरुणाला मारहाण
- Rahul solapurkar ला गोळ्या घाला, कवट्या महांकाळ जिथं दिसेल तिथं हाणा; उदयनराजे- सुरेश धस आक्रमक
- “मी पालकमंत्री असताना एकही…”; Pankaja Munde आणि धनंजय मुंडेंमध्ये मतभेद? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ