Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत सातत्याने भर पडत चालली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पत्रकार परिषद घेत कृषी साहित्य घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
पण धनंजय मुंडे (Anjali Damania vs Dhananjay Munde) यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. अशातच आता या घोटाळ्यातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषी साहित्य खरेदी (Purchase of agricultural materials) करण्यापूर्वी तत्कालीन खात्याच्या सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली केली होती. कारण त्यांनी कृषी खरेदीच्या वाढीव किमतीला विरोध केला होता.
कामात अडचण ठरत असल्याने व्ही. राधा (V Radha) यांची बदली करण्यात आली होती आणि त्यानंतर ही खरेदी प्रक्रिया पार पडली. इतकेच नाही तर व्ही. राधा यांच्या बदलीसाठी मुंडेंकडून सतत दबाव टाकला जात असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Agricultural materials scam
कृषी साहित्य घोटाळ्यातील आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. यावर धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Santosh Deshmukh हत्येप्रकरणी फरार कृष्णा आंधळे सापडत नसल्याने Supriya Sule यांचा सरकारवर निशाणा, म्हणाल्या…
- Ladki Bahin Yojana । सरकारचा मोठा निर्णय! पुण्यातील ‘त्या’ लाडक्या बहिणींचे अर्ज होणार थेट बाद, जाणून घ्या नेमकं कारण
- धक्कादायक! Santosh Deshmukh हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहिल्याने कृष्णा आंधळेच्या मित्रांनी केली तरुणाला मारहाण