Share

कालीचरण महाराजांचा Rahul Gandhi यांच्यावर निशाणा, म्हणाले; “त्यांचे मुंडके छाटून त्याची माळ करा आणि…”

by MHD
Kalicharan Maharaj criticizes Rahul Gandhi Tweet about Chhatrapati Shivaji Maharaj

Rahul Gandhi । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टवरून (Rahul Gandhi Tweet about Chhatrapati Shivaji Maharaj) राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. यावरून काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे.

यावर आता कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांचे मुंडके छाटा. त्यांच्या मुंडक्याची माळ तुळजाभवानीच्या गळ्यात घाला,” असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराजांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केले आहे.

Kalicharan Maharaj on Rahul Gandhi

“राहुल गांधी यांच्यासारख्या मूर्ख माणसावर काय बोलायचे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये सर्व हिंदूंनी सहभागी व्हा. छावा (Chhava) हा चित्रपट टॅक्स फ्री झाला पाहिजे आणि नाही झाला तरी सर्व हिंदूंनी हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. कारण या चित्रपटातून मुस्लिमांनी किती अत्याचार केला हे पाहायला मिळेल,” अशी प्रतिक्रिया कालीचरण महाराज यांनी केला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या पोस्टवरून काँग्रेसने भाजपला खडे बोल सुनावले आहेत. “राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक्सवर पोस्ट करताना श्रद्धांजली या शब्दाचा भाजपकडून बाऊ केला जात आहे. खऱ्या मुद्द्यावर भाजपला बोलायचं नाही. शिवाजी महाराज यांनी दिलेलं मुल्य, महिला युवा शेतकरी यांच्या मुळ मुद्यांवर भाजपला बोलायचं नाही. महिलांवर रोज बलात्कार होत आहेत. बेरोजगारी वाढली आहे, यावर भाजपला उत्तर द्यायचं नाही,” असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Kalicharan Maharaj has now targeted Rahul Gandhi for posting about Chhatrapati Shivaji Maharaj on social media.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now