Share

Dhananjay Munde यांना दोन मिनिटं बोलणंही मुश्किल, झालं ‘या’ वेगळ्याच आजाराचं निदान

Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून विरोधकांनी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकीय दबाव येत असल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बैठकांना आणि जनता दरबार कार्यक्रमाला पाठ फिरवत असल्याची माहिती समोर … Read more

Published On: 

Dhananjay Munde

Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून विरोधकांनी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकीय दबाव येत असल्याची माहिती समोर आली आहे.

धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बैठकांना आणि जनता दरबार कार्यक्रमाला पाठ फिरवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंडे लवकरच राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

धनंजय मुंडे X वर लिहितात, ” माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता,” अशी माहिती मुडेंनी दिली आहे.

“त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही,” असे स्पष्टीकरणही मुंडेंनी दिले आहे.

“याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल,” असा विश्वास मुंडेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या पोस्टमुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकांना आणि जनता दरबार कार्यक्रमाला का उपस्थित राहत नाही, याचे कारण स्पष्ट झाले आहे. तसेच इतर चर्चांना देखील पूर्णविराम मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही