Share

“अजित पवारांवर विश्वास नाही, तेच मुंडेंना…”; Karuna Munde यांचा खळबळजनक खुलासा

Karuna Munde । मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधक सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सतत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत आहेत. अशातच आता करुणा मुंडे यांनीही धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. “धनंजय मुंडेंनी खूप भ्रष्टाचार केले असून त्यांची सगळी प्रकरण अंजली दमानिया बाहेर … Read more

Published On: 

Ajit Pawar Dhananjay Munde karuna munde

Karuna Munde । मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधक सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सतत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत आहेत.

अशातच आता करुणा मुंडे यांनीही धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. “धनंजय मुंडेंनी खूप भ्रष्टाचार केले असून त्यांची सगळी प्रकरण अंजली दमानिया बाहेर काढतील. अजित पवार सातत्याने धनंजय मुंडेंना वाचवत आहे. सरकारकडून लोकांच्या मतांचा गैरवापरकेला जातोय,” असा दावा करुणा मुंडेंनी केला आहे.

“धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर लोकांनी त्यांना नाकारले. तरी देखील आता त्या मंत्रिमंडळात आहेत. वाल्मिक कराडने मारहाण केली असून आता तो जेलमध्ये सडत आहे. धनंजय मुंडेंची देखील तीच अवस्था होणार आहे,” असा घणाघात करुणा मुडेंनी केला.

पुढे त्या म्हणाल्या की, अजित पवार यांच्यावर माझा विश्वास नाही कारण ते ऐकत नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच झाला असता. कारण शरद पवार यांनी मला 4 ते 5 वेळा फोन करून बोलवले होते. अजित पवारांनी काही तरी केलं आणि शरद पवार यांनी मला वेळ दिला नाही,” असा दावा करुणा मुंडेंनी केला आहे.

दरम्यान, करुणा मुंडे यांच्या गंभीर आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी राजकीय दबाव वाढत चालला आहे. यावर आता अजित पवार गट आणि अजित पवार काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही