Manikrao Kokate । कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्यावर १९९५ मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोप करण्यात आला होता. कोर्टाच्या या निर्णयामुळे कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे.
कोकाटे यांची आमदारकी देखील धोक्यात आली आहे. कोर्टाच्या या निर्णयावर कोकाटे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “तुकाराम दिघोळे हे राज्यमंत्री असताना त्यांचा आणि माझा आणि राजकीय वैर होते. या वैरामुळे त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर केस दाखल केली. न्यायालयाने सुनावलेले निकालपत्र 40 पानांचे असून ते मी वाचले नाही,” असे कोकाटे यांनी म्हटले आहे.
“देशात राजकीयदृष्ट्या अशा प्रकारचे अनेक निकाल लागले असून मी हायकोर्टात जाणार आहे. जसा निकाल सुनावण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. तसाच आम्हाला एक नागरिक म्हणून न्याय मागण्याचा अधिकार आहे,” अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिली आहे.
कोकाटे यांनी जामिनासाठी जिल्हा कनिष्ठ न्यायालयात अर्ज केला असून या अर्जावर सुनावणी सुरू आहे. थोड्याच वेळात याबाबत निर्णय होईल. न्यायालय कोकाटे यांच्या जामीन अर्जावर काय निर्णय देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर अजित पवार गटाचे आणखी एका नेत्याच्या अडचणीत भर पडली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कोकाटे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :