🕒 1 min read
Vijay Wadettiwar । काल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना 1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik District Court) दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
Vijay Wadettiwar post on X
विजय वडेट्टीवार X वर लिहितात, “मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी 24 तासांत रद्द करण्यात आली. सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी 24 तासांत आमदारकी रद्द केली,” असे वडेट्टीवार म्हणाले.
“आता, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहे? धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेतलेला नाही?,” असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
“त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने शिक्षा सुनावली, तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही. सत्ता आहे म्हणून ‘आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड‘ ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय?,” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यानंतर विरोधक माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळ तापल्याचे पाहायला मिळत आहे. जर विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले तर नाइलाजाने पवारांना कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा लागू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
- सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी Dhananjay Munde यांचा राजीनामा घेणार? महत्त्वाची माहिती समोर
- “दमानियांची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची तरी…”; Dhananjay Munde यांच्यासाठी सदावर्ते मैदानात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








