Chitra Wagh | मुंबई: काल (09 ऑगस्ट) लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावरून गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळानंतर भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) गंभीर आरोप केला होता.
राहुल गांधींनी महिला खासदारांना फ्लाईंग किस दिली असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडं राहुल गांधींच्या विरोधात तक्रार केली. या घटनेनंतर देशात अनेक ठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात आलं.
राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किस प्रकरणावर मुंबईत भाजप महिला आघाडीनं आंदोलन केलं आहे. यावेळी बोलत असताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राहुल गांधींवर खोचक टीका केली आहे.
चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “लोकसभेचं सभागृह हे लोकशाहीचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये निंदनीय घटना घडली आहे. मणिपूर हिंसाचाराचा गंभीर मुद्दा सुरू असताना राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिली.
लोकशाहीच्या मंदिरामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. त्या ठिकाणी अशा प्रकारचं अभद्र कृत्य करणं योग्य दिसत नाही. रोड रोमिओ आणि राहुल गांधींमध्ये काहीच फरक नाही, हे त्यांच्या या कृत्यानंतर दिसून आलं आहे.”
Rahul Gandhi’s mental balance is disturbed – Chitra Wagh
पुढे बोलताना त्या (Chitra Wagh) म्हणाल्या, “राहुल गांधी यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळं आमची सोनिया गांधी यांना विनंती आहे की, राहुल गांधीचं लग्न करून टाका.
देशाला जर वाचवायचं असेल तर राहुल गांधींचं लग्न होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ते आजकाल डोळे मारतात, मिठ्या मारतात आणि आता फ्लाईंग किस देत आहे. राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.”
दरम्यान, या प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “राज्य सरकारनं राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याआधी आम्हाला किरीट सोमय्या प्रकरणाबाबत उत्तर द्यावं.
किरीट सोमय्या प्रकरणाबाबत मी स्वतः विधान परिषद सभापतींना एक व्हिडिओचा पेनड्राइव दिला होता. त्यानंतर या प्रकरणाची कारवाई कुठपर्यंत आली आहे? याबाबत सरकारनं आधी आम्हाला स्पष्टीकरण द्यावं आणि मग राहुल गांधींवर टीका करावी.”
महत्वाच्या बातम्या
- Ambadas Danve | “आधी किरीट सोमय्यांची चौकशी करा आणि मग राहुल गांधी…”; अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका
- Vijay Wadettiwar | “ट्रीपल इंजिन सरकारमधील आमदारांना सत्तेची गुर्मी…”; पत्रकार मारहाण प्रकरणावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- Rohit Pawar | “हे आपल्या संस्कृतीला न शोभणारे…”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
- Devendra Fadnavis | फॉक्सकॉन महाराष्ट्रामध्येच येणार – देवेंद्र फडणवीस
- Ajit Pawar | “राज्यातील विकास प्रकल्पांसाठी अमित शाह…”; अजित पवारांचं मोठं विधान