Share

Vijay Wadettiwar | “ट्रीपल इंजिन सरकारमधील आमदारांना सत्तेची गुर्मी…”; पत्रकार मारहाण प्रकरणावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण करण्यात आली आहे. संदीप महाजन यांनी किशोर पाटील (Kishore Patil) यांना शिवीगाळ केल्यामुळं काही अज्ञातांनी त्यांना मारहाण केली असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणावर विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत राज्य … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण करण्यात आली आहे.

संदीप महाजन यांनी किशोर पाटील (Kishore Patil) यांना शिवीगाळ केल्यामुळं काही अज्ञातांनी त्यांना मारहाण केली असल्याचं बोललं जात आहे.

या प्रकरणावर विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “ट्रीपल इंजिन सरकारमधील आमदारांना सत्तेची गुर्मी…जनता यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही!

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर सत्ताधारी आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. एका स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्रकार मुलाला विरोधात बातमी छापली म्हणून अशा प्रकारे मारणे कितपत योग्य आहे? राज्यातील सर्व पत्रकार बांधवांनी पुढे येऊन या घटनेचा निषेध करायला हवा.”

पुढे ते (Vijay Wadettiwar) म्हणाले, “ज्या राज्यात पत्रकार बांधवांच्या आवाजाची गळचेपी होत असेल, मारहाण होत असेल त्या राज्यात सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला काय येत असेल हे यावरून स्पष्ट होते.

पाचोरा भडगाव मतदारसंघात ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्त्या करण्यात आलेल्या प्रकरणाबाबत पत्रकाराने आमदार पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारून न्यायाची मागणी केली होती.

त्यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सदर पत्रकाराला फोनवरून आई बहिणीवर अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ सुद्धा केली होती. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का?

Sandeep Mahajan has been attacked by unknown persons

दरम्यान, जळगाव जिल्ह्यामध्ये एका 08 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर युट्युब पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारला होता.

त्यानंतर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी संदीप महाजन यांना शिवीगाळ केलेली एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती.

त्यानंतर संदीप महाजनांवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये किशोर पाटील यांनी संदीप महाजन यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली असल्याचं ऐकू आलं होतं. त्यामुळं किशोर पाटील यांनीच महाजन यांच्यावर हल्ला केला असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install