🕒 1 min read
Dhananjay Munde । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणावरून सातत्याने अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता एका बड्या नेत्याने त्यांच्या फाशीची मागणी केली आहे, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आज पुण्यात आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मोर्चाला संबोधित करताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी धनंजय मुंडे यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. बोलताना ते म्हणाले की, “आकाचा आका कोण? मराठा समाज हा न्याय देण्याच्या भूमिकेत होता, आज तो समाज न्याय मागण्याच्या भूमिकेत आला आहे. हे कुणी केली? त्याला रस्त्यावर आणून मारेकऱ्यांसह धनंजय मुंडेंना फाशी व्हावी,” अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली.
भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनीही मुंडेंच्या सातपुडा या सरकारी बंगल्यावर आवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी, शुक्ला, वाल्मिक कराड, बिक्कड यांच्यात खंडणीची बैठक पार पडली, असा दावा केला आहे. यामुळे मंत्री मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहे, असे बोलले जात आहे.
Arvind Shinde on Dhananjay Munde
तसेच “जर धनंजय मुंडे मराठा समाजावर आरोप करत असतील, तर आम्ही देखील जरूर त्याला प्रतिउत्तर देऊ. जर तुम्ही मोर्चे काढले, तर आम्ही देखील मोर्चे काढू. त्यामुळे धनंजय मुंडे वेळीच शहाणा हो, आम्ही आता थांबणार नाही. ज्या मराठ्यांनी तुला साथ दिली, त्यांच्यावरच पलटण्याचा प्रयत्न करू नकोस,” असा गंभीर इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- “जे आरोपींची मदत करत असतील त्यांना…”; Santosh Deshmukh यांच्या मुलीची प्रशासनाकडे ‘ही’ मागणी
- मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर झाली खंडणीची डील, Suresh Dhas यांनी सांगितला खळबळजनक घटनाक्रम
- “देशमुख प्रकरणात Dhananjay Munde यांना सहआरोपी करा”; प्रशांत जगतापांचं वक्तव्य चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








