Share

“देशमुख प्रकरणात Dhananjay Munde यांना सहआरोपी करा”; प्रशांत जगतापांचं वक्तव्य चर्चेत

"देशमुख प्रकरणात Dhananjay Munde यांना सहआरोपी करा"; प्रशांत जगतापांचं वक्तव्य चर्चेत

Dhananjay Munde |  संतोष देशमुख खून प्रकरणामधील आरोपींकडून पोलीस कसून चौकशी केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यभरातून मोर्चे काढले जात आहेत. आज पुण्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

“संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि या प्रकरणी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांना देखील सहआरोपी करा”, असं प्रशांत जगताप ( Prashant Jagtap ) यांनी म्हंटल आहे.

ते म्हणाले , “संतोष देशमुख कर्तुत्वावान होते. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लपवण्याचं काम सरकारने केलं आहे. वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे याने या आरोपींना लपवण्याचं काम केलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियत साफ नाही.” वाल्मिक कराडसह सगळया आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.

धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून काढून टाका, असंही पुढे प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात जो आक्रोश झाला आहे, या आधी असा कधीच आक्रोश पहिला नव्हता. सरकारने प्रकरण नीट हाताळल नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

“संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि या प्रकरणी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांना देखील सहआरोपी करा”, असं प्रशांत जगताप ( Prashant Jagtap ) यांनी म्हंटल आहे.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now