Share

…त्यावेळी Suresh Dhas सोडणार राजकारण, भरसभेत केला दावा

Leaders of all parties have attended the march in Pune today. On this occasion MLA Suresh Dhas has directly appealed to Deputy Chief Minister Ajit Pawar.

by MHD

Published On: 

...त्यावेळी Suresh Dhas सोडणार राजकारण, भरसभेत केला दावा

Suresh Dhas । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना अजूनही शिक्षा झाली नाही, यामुळे आज पुण्यात मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी आमदार सुरेश धस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आवाहन केले आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात कोणालाच सोडू नये. अजित पवार हे मनाने प्रांजळ असून त्यांचं हृदय पाच वर्षाच्या लेकरासारखं आहे. मी 10-11 वर्षे त्यांच्यासोबत काम केले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

“अजितदादा, मी तुमच्या पाया पडतो. तुमचं काय अडकलं यांच्यापाशी’, अशी आर्जव यावेळी सुरेश धसांनी केली. धनंजय मुंडे यांना अगोदर बाहेर काढा. जर खंडणीसाठी सातपुडा या सरकारी बंगल्यावर बैठक झाली आहे, हे जर खोटं निघालं तर राजकारण सोडून देईल,” असा दावा धस यांनी केला आहे.

Suresh Dhas to Ajit Pawar

संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड आत गेल्यापासून नितीन कुलकर्णी गायब झाला आहे. त्याला पकडून त्याच्याकडील असणारे 17 मोबाईल ताब्यात घ्या. या आकाने कुणा-कुणाकडून किती माल जमा केला आहे? याची सर्व माहिती समोर येईल, असाही दावा धस यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही