Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात अजित पवार हे केंद्रबिंदू ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर बारामती चांगलीच चर्चेत आलेली पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी आज बारामती दौरा केला.
या दौऱ्यात त्यांनी बारामतीमधील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्धाटन केलं. यावेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.
अजित पवार मेडदमधील भाषणात बोलत असतानाच काही लोक निवेदन देत होते. भाषण सुरू असतानाच अजित पवार निवेदनं वाचत अधिकाऱ्यांना बोलावून अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घाला अशी सूचना करताना दिसले. यावेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाले नसल्याचं म्हटलं. त्या कार्यकर्त्याच्या विधानावर बाकी नागरिकही सहमत होऊन बोलू लागले. यावर अजित पवार भडकले. “अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?”, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या :