Share

“तुम्ही इतके दिवस गप्प का बसला?”, Rupali Chakankar यांचा सुरेश धसांना परखड सवाल

by MHD
"तुम्ही इतके दिवस गप्प का बसला?", Rupali Chakankar यांचा सुरेश धसांना परखड सवाल

Rupali Chakankar । संतोष देशमुख हत्याप्रकरणी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना सळो की पळो करून सोडले आहे. यावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सुरेश धस यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

बोलताना त्या म्हणाल्या की, “संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. तुम्ही न्यायाच्या बाजूने आवाज उठवत आहात पण त्यामध्ये तुमचा राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न टाळावा. जर सुरेश धस यांना गृहखात्यापेक्षा सखोल माहिती होती तर तुम्ही इतके दिवस गप्प का होते? असा सवाल रूपाली चाकणकर यांनी केला आहे.

दरम्यान, “अजितदादा, मी तुमच्या पाया पडतो. तुमचं काय अडकलं यांच्यापाशी’, अशी आर्जव यावेळी सुरेश धसांनी केली. धनंजय मुंडे यांना अगोदर बाहेर काढा. जर खंडणीसाठी सातपुडा या सरकारी बंगल्यावर बैठक झाली आहे, हे जर खोटं निघालं तर राजकारण सोडून देईल,” असा दावा धस यांनी केला आहे.

Rupali Chakankar on Suresh Dhas

तसेच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड आत गेल्यापासून नितीन कुलकर्णी गायब झाला आहे. त्याला पकडून त्याच्याकडील असणारे 17 मोबाईल ताब्यात घ्या. या आकाने कुणा-कुणाकडून किती माल जमा केला आहे? याची सर्व माहिती समोर येईल, असाही दावा धस यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Dhas has left Minister Dhananjay Munde in the lurch. Now State Women’s Commission Chairperson Rupali Chakankar has taken a dig at Suresh Dhas.

Marathi News Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now
by MHD