Share

सुजय विखेंच्या मनमानी कारभाराला कंटाळून कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र; अहमदनगरात भाजपला मोठे भगदाड

🕒 1 min readSunil Rasne vs Sujay Vikhe | राज्याच्या राजकारणात अहमदनगर शहर महत्वाचे मानले जाते. नगरच्या राजकारणांवर महाराष्ट्राचे बारीक लक्ष असते. सद्या नगरच्या राजकारणात सुजय विखेंच्या भाषणातील सुटत चाललेला तोल चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी निलेश लंके यांना आव्हान देत ‘निलेश लंके यांनी पाठांतर करुन माझ्यासारखे फाडफाड इंग्रजी बोलावे, आपण … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sunil Rasne vs Sujay Vikhe | राज्याच्या राजकारणात अहमदनगर शहर महत्वाचे मानले जाते. नगरच्या राजकारणांवर महाराष्ट्राचे बारीक लक्ष असते. सद्या नगरच्या राजकारणात सुजय विखेंच्या भाषणातील सुटत चाललेला तोल चर्चेचा विषय बनला आहे.

काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी निलेश लंके यांना आव्हान देत ‘निलेश लंके यांनी पाठांतर करुन माझ्यासारखे फाडफाड इंग्रजी बोलावे, आपण उमेदवारी मागे घेऊ’ असे म्हणाले होते. यानंतर आता ‘आमच्या नावे मान्य नसतील तर तुतारी वाजवून टाका’, असे आवाहन सुजय विखे यांनी मतदारांना केल्याने भाजपमधील मोठे नेते नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सुजय विखेंच्या मनमानी कारभाराला कार्यकर्ते आणि पदाधिकारी कंटाळले आहेत. नगर दक्षिण मतदार संघातील शेवगाव येथील भाजपचे सरचिटणीस सुनील रासने यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत, सुजय विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

सुजय विखे लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर नागरिकांच्या सुविधांकडे लक्ष दिले नाही. तसेच त्यांनी येथील नागरिकांशी संवाद देखील साधला नसल्याचा आरोप सुनील रासने यांनी केला आहे.

सुनील रासने म्हणाले की,”  पार्टी म्हणजेच मी आणि मी म्हणजेच मतदार संघातील जनता, असा समज करून त्यांनी घेतला आहे. गेल्या पाच वर्षात कधीही सुजय विखे यांनी नागरिकांचे फोन नउचलेले नाहीत तसेच मतदारसंघात ढुंकुण देखील पाहिले नाही. त्यामुळेच आता डाळ आणि साखर वाटण्याचे काम ते करत आहेत. परंतु मतदारांशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती असा टोला रासने यांनी सुजय विखेंना लगावला.

सुजय विखे यांना पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसला असून गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. यामुळे अहमदनगर मध्ये भाजपला मोठे भगदाड पडले असल्याचे चित्र आहे.

भारतीय जनता पक्ष हा देशामध्ये 400 पार करेल मात्र त्यामध्ये नगर दक्षिणची जागा नसणार याचे दुःख मतदार संघातील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असल्याचे रासने यांनी म्हटले आहे. नगर दक्षिण मतदारसंघातील भाजपच्या हजारो निष्ठावंताची हीच भावना असल्याचे रासने यांनी सांगितले आहे.

सुनील रासने भाजपचे सरचिटणीस असून त्यांनी शहर उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस असे अनेक महत्त्वाचे पदे भूषवली आहेत. ते अनेक वर्षांपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.

Lok Sabha Election 2024 Sunil Rasne vs Sujay Vikhe 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!