Share

आमच्या नावाची अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका – सुजय विखे

🕒 1 min read Lok Sabha Election 2024, Sujay Vikhe । अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी मोठं विधान केले आहे. ‘आमच्या नावाची अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका’, असे सुजय विखे यांनी मतदारांना आवाहन केल्याने भाजपमधील मोठया नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुतीकडून सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्यामध्ये लोकसभेची … Read more

Published On: 

🕒 1 min read

Lok Sabha Election 2024, Sujay Vikhe । अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी मोठं विधान केले आहे. ‘आमच्या नावाची अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका’, असे सुजय विखे यांनी मतदारांना आवाहन केल्याने भाजपमधील मोठया नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महायुतीकडून सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्यामध्ये लोकसभेची लढत होत आहे. प्रचाराच्या सभेत बोलताना सुजय विखे पाटील यांनी ‘आमच्या नावाची अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका’ असे मोठे विधान केले आहे.

सुजय विखे नेमके काय म्हणाले?

“काही लोकांना सुजय विखे मान्य नसतील तर मोदींचे नाव सांगा. आमच्या दोघांची अडचण असेल तर ताईंचे नाव सांगा. तिघांची अडचण असेल तर अरुण मुंडेंचे नाव सांगा. आमची सर्वांची अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका”, असे म्हणत सुजय विखे यांनी भरसभेत हात जोडले. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सुजय विखे यांचा भाषणातील तोल सुटत चालला असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यामुळे भाजप नेते हि विखे यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी निलेश लंके यांना आव्हान देत ‘निलेश लंके यांनी पाठांतर करुन माझ्यासारखे फाडफाड इंग्रजी बोलावे, आपण उमेदवारी मागे घेऊ’ यानंतर आता ‘आमच्या नावे मान्य नसतील तर तुतारी वाजवून टाका’, असे म्हटल्यामुळे सुजय विखे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Lok Sabha Election 2024 Sujay Vikhe

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही