विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी RBI वर दबाव! माजी गव्हर्नर सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप

Pressure Was Put On RBI To Paint Rosier Picture Of Growth, Claims Ex Governor

RBI  । यूपीए सरकारच्या कार्यकाळात, प्रणव मुखर्जी आणि पी. चिदम्बरम हे अर्थमंत्री असताना व्याजदर कमी करण्यासाठी, तसेच बाजाराचा विश्वास वाढवण्याच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेच्या वाढीचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेवर (RBI) दबाव टाकत असत असा दावा ‘आरबीआय’चे माजी गव्हर्नर सुब्बाराव यांनी केला आहे.

डी सुब्बाराव यांनी त्यांच्या कारकीर्दीवर आधारित ‘जस्ट अ मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाइफ अॅण्ड करिअर’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी ‘आरबीआय’च्या स्वायत्ततेचे महत्त्व याबद्दल सरकार संवेदनशील नसल्याचा गंभीर आक्षेप नोंदवला आहे. ‘‘सरकार आणि आरबीआय या दोन्ही ठिकाणी काम केल्यानंतर मी काही प्रमाणात अधिकाराने असे म्हणू शकतो की, मध्यवर्ती बँकेच्या स्वायत्ततेचे महत्त्व याबद्दल सरकारमध्ये फारशी समज आणि संवेदनशीलता नसते’’.

पुस्तकातील ‘रिझर्व्ह बँक अॅज द गव्हर्न्मेंट्स चीअर लीडर’’ या प्रकरणात व्याजदरासंबंधी ‘आरबीआय’ने घेतलेली भूमिका केंद्र सरकारला मान्य नसल्यामुळे दबाव टाकला जात असे. कधी कधी तर अर्थव्यवस्थेची वाढ आणि चनलवाढ याबाबत आमच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापनापेक्षा वेगळे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी ते आमच्यावर दबाव टाकत असत.

याबद्दल त्यांनी एका घटनेचे वर्णन करताना लिहिले आहे की, ‘‘मला आठवते, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते, अरविंद मायाराम वित्त सचिव आणि कौशिक बसू मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यांची गृहीतके आणि अंदाज यांच्या आधारे त्यांनी आम्ही काढलेल्या अंदाजाला विरोध केला होता. बाजाराचा आत्मविश्वास वाढवण्याची सरकारची जबाबदारी आरबीआयनेही वाटून घ्यावी असे त्यांना वाटत होते. या सर्व प्रकारामुळे मी अस्वस्थ झालो होतो’’, असे सुब्बाराव यांनी लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.