Dollar | मुंबई : अमेरिकी डॉलरपुढे भारतीय रुपयाने ८३.६८ ही रुपयांची ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. मध्यपूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेपुढे निर्माण केलेली अनिश्चितता आणि अमेरिकेत व्याजदर कपातीला उशीर होण्याच्या चिंतेचा ताण रुपयाच्या मूल्यावर दिसून आला.
मंगळवारी आंतरबँक चलन व्यवहारात, रुपयाने ८३.५१ या नीचांकापासूनच व्यवहारास सुरुवात केली. त्यानंतर आजच्या सत्रात रुपयातील घसरण अधिक वाढल्याने रुपयाने ८३.६८ ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली.
सध्या चालू असलेल्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे रुपया कमकुवत राहण्याची अपेक्षा आहे. जागतिक खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकी रोखे उत्पन्नातील वाढ यामुळे तेथील मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीस विलंब होण्याची शक्यता आहे. तसेच इराणच्या हल्ल्याला इस्रायलच्या प्रत्युत्तरामुळेदेखील बाजारपेठेवर दबाव निर्माण होण्याची भीती आहे.
महत्वाच्या बातम्या