पालकमंत्री संदिपान भुमरेंचा पत्ता कट; आश्वासक चेहरा म्हणून राजेंद्र जंजाळ यांचे नाव आघाडीवर

rajendra janjal eknath shinde Chhatrapati Sambhajinagar Lok sabha Election 2024

छत्रपती संभाजीनगर । राजेभाऊ मोगल । Rajendra Janjal । नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत वादंग पेटलेलेच आहे. नाशिकची जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळायला हवी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर जागेबाबतही महायुतीत एकमत होताना दिसेना झाले आहे.

काही दिवसापूर्वी पालकमंत्री संदीपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली म्हणून भुमरे समर्थकांनी जल्लोष केला होता. पण भाजपने भुमरे यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध दर्शवत संभाजीनगरची जागा भाजपला देण्यात यावी, यासाठी भाजप नेते आग्रही आहेत. भुमरे यांना तिकीट दिले तर त्यांचे डिपॉजिट जप्त होण्याची नामुस्की येऊ शकते, असा अंदाज भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत समोर आला आहे.

शिवसेना फुटीनंतर संदीपान भुमरे यांना प्रसिद्धी मिळाली परंतु जनतेच्या मनात ठसा उमठवायला ते कमी पडले आहेत. भुमरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील आहेत. उदा. बेकायदेशीर दारू विकी, विकास कामात टक्केवारी, नातेवाईकांना कंत्राटे मिळून देणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर आहेत. यामुळे भाजपने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

त्यामुळे भाजपकडून मंत्री अतुल सावे तर शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचे नाव चर्चेत आहे. पण ही जागा शिंदे गटालाच मिळणार असल्याने राजेंद्र जंजाळ हेच उमेदवार असतील, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आग्रही आहेत.

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत खैरे यांना आव्हान देणे सोपे नसणार असल्याचे समोर आले आहे. महायुतीकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेच चंद्रकांत खैरे यांना तगडे आव्हान देऊ शकतात, त्यामुळेच त्यांच्यावर शिंदे गटाकडून दबाव टाकण्यात आलेला होता. तसेच दानवे यांना महायुतीत घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून फोनवर फोन केले जात होते. दानवे काही केल्याने शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला तयार नाहीत.

अंबादास दानवे यांच्या एवढाच आक्रमक चेहरा आणि युवा संघटन असलेल्या नेता म्हणून शिंदे गटाकडून राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. जंजाळ यांनी प्रचार यंत्रणा हातात घेत, मतदार संघातील कार्यकर्ते, शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे मुख्यमंत्र्यांसोबत अत्यंत चांगले संबंध आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्याच उमेदवारीची चर्चा होती. मात्र, त्यांच्या नावाला शिंदे गटातील नेत्यांसह भाजपच्या नेत्यांचाही विरोध होत असल्याने त्यांचे नाव आता मागे पडले असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजेंद्र जंजाळ यांच्या उमेदवारीवर ठसा उमटवणारे मुद्धे 

  • राजकीय पार्श्वभूमी नसलेला सामान्य कुटुंबातील स्वतःच्या कर्तुत्वावर पुढे आलेला आक्रमक नेता.
  • राजेंद्र जंजाळ उच्चशिक्षित असून त्यांचे  B.A.  L.L.B झाले आहे.
  • हिंदुंच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका.
  • युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणारा नेता,
  • उपमहापौर पदावर काम करत असताना दाखवलेली प्रशासकीय कामाची चुणूक,
  • शहराच्या विकासासाठी अनेक प्रश्न मांडत ते सोडवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.