Arvind Kejriwal | “…म्हणून पंतप्रधान शिकलेला असावा, अडाणी नको”; नोटबंदीवर अरविंद केजरीवाल यांची मोदींवर टीका

Arvind Kejriwal | नवी दिल्ली : काल (19 मे) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2 हजाराच्या नोटेबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये म्हटलं आहे की, आता चलनातून दोन हजार रुपयांची नोट काढण्यात येणार असून ती नोट 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेतून बदलून घेता येणार आहेत. त्यानंतर ती चलनात वापरता येणार नाही. RBI च्या या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर ( Narendra Modi ) टीका केली आहे.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल ( What did Arvind Kejriwal say)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आधी ते म्हणतात , दोन हजारांच्या नोटेमुळे भ्रष्टाचार संपेल. म्हणून चलनात 2 हजाराची नोट आणली. परंतु आता ते म्हणत आहेत की, दोन हजारांची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपेल. म्हणून यासाठी आम्ही म्हणतोय की, पंतप्रधान शिकला-सवरलेला असावा. एका अडाणी पंतप्रधानाला कुणीही काहीही सांगतं त्याला काहीही सजमत नाही. याचा त्रास फक्त जनतेला सहन करावा लागतो”. अशा शब्दात केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

दरम्यान, 2016 मध्ये देखील नोटबंदी बाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन 500 आणि 2000 च्या नोटा बाजारात आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये 2 हजार रुपयांची नोट बाजारात पाहायला मिळाली. तसचं RBI ने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, 2019 पासूनच 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. यामुळे आता नागरिकांना देखील याबाबत जागृत राहून आपल्याकडील 2 हजारांच्या नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-