Share

“स्वत:च्या भावाचे होऊ शकले नाहीत ते…”; भरत गोगावलेंची Sunil Tatkare यांच्यावर टीका

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Published On: 

"स्वत:च्या भावाचे होऊ शकले नाहीत ते..."; भरत गोगावलेंची Sunil Tatkare यांच्यावर टीका

🕒 1 min read

Sunil Tatkare | राज्य सरकारकडून शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यात रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले (Bharat Gogawale) हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते.

भरत गोगावले यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. यामुळे महायुतीतील पालकमंत्रिपदाचा वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

सुनील तटकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचं भरत गोगावले म्हणालेत. “आम्ही व्यवहाराने चालणारी माणसं आहोत. आम्ही ज्या प्रमाणे निवडणुकीत काम केलं तसंच काम जर त्यांच्याकडून झालं असतं, तर त्याचा विचार केला गेला असता. मात्र, आम्ही प्रामाणिकपणे काम करायचं. पण त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसायचा, मग ही कोणती रित?”,असा सवाल करत गोगावले यांनी तटकरेंवर हल्लाबोल केलाय.

“जे स्वत:च्या भावाचे होऊ शकले नाहीत मग ते तुमचे आणि आमचे काय होणार?”, असं म्हणत भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधलाय. दरम्यान, भरत गोगावले विरुद्ध तटकरे वाद पेटलेला असतानाच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या