Share

 मोठी बातमी! Walmik Karad चा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे; कारण काय?

वाल्मिक कराडचे ( Walmik Karad ) वकील अशोक कवडे यांनी खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. जामीन अर्ज मागे घेण्यामागचं कारण अजूनही समोर आलेलं नाही.

Published On: 

 मोठी बातमी! Walmik Karad चा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे; कारण काय?

Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या ( Santosh Deshmukh Murder Case ) प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. देशमुख यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. यादरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.

खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अडचणीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. कालच त्याला बीड न्यायालयाने आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. वाल्मिक कराडच्या वकिलांनी खंडणी प्रकरणात जामीन अर्जदेखील दाखल केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी दोन तारखा झाल्यानंतर आज सुनावणी होणार होती.

त्यामुळे कराडला जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे यांनी हा जामीन अर्ज मागे घेतला आहे. जामीन अर्ज मागे घेण्यामागचं कारण अजूनही समोर आलेलं नाही.

Walmik Karad Hospitalized

याचबरोबर वाल्मिक कराड याची प्रकृतीही बिघडल्याचं समोर आलं आहे. वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. बीड जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी शल्यचिकित्सक डॉ.एस.बी. राऊत यांनी कराडच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही