Santosh Deshmukh । सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. यावरून राजकीय वातावरण देखील तापले आहे. महायुतीतील काही नेत्यांसह विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या हत्याकांडातील आणखी एक कनेक्शन समोर आले आहे. (Santosh Deshmukh murder)
सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींनी हत्याकांडानंतर सर्वात आधी भिवंडी येथे आश्रय घेतला होता. तेथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सोन्या पाटील यांच्याकडून समाज कल्याण न्यास या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सेवाकार्य केले जात असून त्यांचे बीड जिल्ह्यात सामाजिक काम असल्याने ओळख सांगून आरोपी त्यांच्या कार्यालयात गेले होते.
पण ते नसल्याने त्यांचे भाऊ जयवंत पाटील यांना ते भेटले. त्यांना विक्रम डोईफोडे यांच्या वळपाडा येथील दीपाली बीयर शॉप व हॉटेलचा पत्ता देण्यात आला. डोईफोडे हे देव दर्शनासाठी कुटुंबीयांसह बाहेर गेले होते, त्यामुळे त्यांचा संपर्क झाला नाही. संध्याकाळी डोईफोडे यांना जयवंत पाटील याने फोन करून तुझ्या गावाकडचे पाहुणे तुला भेटायला आले होते, त्यांना तुझ्या शॉपचा पत्ता दिला असे सांगितले.
Santosh Deshmukh latest update
त्यानंतर सुमारे अर्धा तासात डोईफोडे यांच्या दुकानावरून कामगार रमेश बारगजे याने फोन केला आणि त्यांना गावाकडील तीन जण आले आहेत. ते एक दिवस राहण्याची व्यवस्था होईल का? असे विचारत असल्याची माहिती डोईफोडे यांना दिली. महत्त्वाचे म्हणजे त्या आधीच जयवंत पाटील याने कार्यालयात आलेल्या एकाचा फोटो विक्रम यांना पाठवून आणि कामगाराने गावाकडील मोठी हत्या करून आल्याचे सांगितले. त्यामुळे डोईफोडे यांनी जागा देण्यास नकार दिला. तेथून ते आरोपी निघून गेले आणि परत आलेच नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या :