Manoj Jarange । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना पकडून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा समाज एकवटला आहे. याच पार्श्ववभूमीवर काल पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याच मोर्चादरम्यान, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सडकून टीका करत आहेत.
जर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या जिवाला धक्का लागला, तर धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी जहरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी परभणी येथे जनआक्रोश मोर्चात केली होती. हेच वक्तव्य आता जरांगेंना भोवले आहे. या टीकेनंतर परळीतील धनंजय मुंडे समर्थकांनी शहर आणि संभाजीनगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
जोपर्यंत मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता. यानंतर तुकाराम आघाव यांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून जरांगे यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Dhananjay Munde vs Manoj Jarange Patil
अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यामुळे पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :