Walmik Karad । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे आपण पाहत आहोत. भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे सतत आरोपी वाल्मिक कराडवर टीका करत असतात. पुन्हा एकदा धस यांनी कराडवर निशाणा साधला आहे.
बोलताना धस म्हणाले की, “वाल्मिक कराडचे एक-दोन नाही तर तब्बल 100 अकाऊंट सापडले आहेत. एरवी 50 पेक्षा जास्त अकाऊंट असेल तर लगेच ईडी चौकशी लागते. पण त्याबाबत अजूनही कराडविरोधात कारवाई झाली नाही. वाल्मिक अण्णा म्हणजे आका 17 मोबाईल नंबर वापरतात. वालुकाका अँड गॅंग गँग्स ऑफ परळी यांच्यामुळे पुण्याचं नाव खराब होऊ शकते,” असा आरोप धस यांनी केला आहे.
Suresh Dhas on Walmik Karad
दरम्यान, धस हे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टीका करत आहेत. यावर आता भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकमेकांवर टीका करणे उचित नाही. त्यांनी अशा प्रकारची विधाने करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांना योग्य तो संदेश दिला आहे,” अशी माहिती प्रवीण दरेकरांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :