Share

“धनंजय मुंडेंना प्रश्न एवढाच आहे की…”; Sambhajiraje नेमकं काय म्हणाले?

“धनंजय मुंडेंना प्रश्न एवढाच आहे की..."; Sambhajiraje नेमकं काय म्हणाले?

Sambhajiraje on Dhananjay Munde | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या ( Santosh Deshmukh murder Case ) प्रकरणी सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे अवघ्या राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. सर्व आरोपी पकडले जावेत आणि त्यांना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी अनेक आंदोलनं आणि मोर्चे आयोजित करण्यात येत आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. त्याआधी संभाजी राजे ( Sambhajiraje ) यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांना खोचक सवाल करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

धनंजय मुंडे म्हणतात, माझा या हत्या प्रकरणाशी संबंध नाही, मग मी राजीनामा का देऊ?, असं धनंजय मुंडेंनी म्हंटल होतं. यावर संभाजीराजे म्हणाले , “धनंजय मुंडेंना प्रश्न एवढाच आहे की, आत गेलेले हे लोक कोणाचे आहेत? वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे? तुमचा संबंध नाही, मग एकदा राजीनामा देऊन तर बघा, होऊन जाऊ द्या फेअर ट्रायल.”

आधी अंतुले, आबा आर.आर.पाटील, अशोक चव्हाण आणि मनोज जोशी यांनी लोकांचा आक्रोश पाहून राजीनामे दिले आहेत. मग हे सरकार धनंजय मुंडे यांना का संरक्षण देतय? अजितदादा का संरक्षण देतायत?, असे सवाल करत हे राज्यपाल महोदयांसमोर मांडणार असल्याचं संभाजीराजे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

संभाजीराजे ( Sambhajiraje ) म्हणाले , “धनंजय मुंडेंना प्रश्न एवढाच आहे की, आत गेलेले हे लोक कोणाचे आहेत? वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे? तुमचा संबंध नाही, मग एकदा राजीनामा देऊन तर बघा, होऊन जाऊ द्या फेअर ट्रायल.”

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now