Suresh Dhas । भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. याप्रकरणी त्यांनी नितीन बिक्कड (Nitin Bikkad) यांचे नाव घेतले होते. यावरून बिक्कड यांनी माध्यमांशी चर्चा करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
“मी 14 जूनला मी गावी होतो. दोन-तीन दिवसांनी मुंबईत आलो. त्यानंतर संपूर्ण आठवडा मी मुंबईत थांबलो होतो. त्यावेळी माझा वाल्मिक कराडशी कसला संपर्क झाला नाही. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होता, त्यावेळी मी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) भेटत होतो. 25 जूनला एका कामानित्ताने धनंजय मुंडे यांना भेटलो होतो. धाराशिवच्या सीईओला फोन करायचा होता. त्यामुळे मुंडेंची भेट घेतली, असे बिक्कड यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, “धस यांच्यासोबत दिसलेला गँगस्टर घायवळ यानेच मला घरी येऊन धमकी दिली. धस आणि गँगस्टर घायवळ यांचे संबंध काय आहे? पवनचक्की माफिया कोण आहे? हे सगळ्या बीड आणि धाराशीवला माहिती आहे.”
Nitin Bikkad on Suresh Dhas
ज्या पवनचक्की खंडणीच्या प्रकरणात सुरेश धस दुसऱ्यांवर आरोप करतात. या प्रकरणात स्वत: असताना इतरांना काय म्हणता? पाटोदा तालुक्यात पवनचक्कीत कोणी किती रुपयांची खंडणी घेतली आहे,” याची माहिती स्थानिकांना आहे असे बिक्कड यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :