Sanjay Raut | राज्यातील राजकारणात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु असतानाच यात आता अजून एक भर पडली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad ) यांनी रविवारी बुलढाण्यात एका जाहीर सभेत केलेलं विधान सध्या चर्चेत आहे.
सभेत बोलताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट मतदानांचा पैशांसाठी विकले गेलेले असल्याचं म्हटलं आहे. “तुमच्यापेक्षा तर रांxx बऱ्या” असं गंभीर विधान केल्यामुळे त्यावरून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. आता खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनीही यावरुन संजय गायकवाड यांना चांगलंच सुनावलं आहे.
मतदारांना जर कुणी वेश्या म्हणत असेल आणि लोकशाहीला रखेल म्हणत असेल आणि संविधानाला कुणी गुलाम मानत असेल तर देवेंद्र फडणवीस यांची ती जबाबदारी असल्याचं संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल यांनी मत व्यक्त केलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
“कोट्यवधी मतदारांना जर कुणी वेश्या म्हणत असेल तर एकनाथ शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पैसे देऊन मतदान घेतलं असेल, चला मी मान्य करतो पण तुम्ही त्यांना वेश्या कसं काय म्हणता?”, असा सवाल संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :