Manoj Jarange यांनी गुन्हा दाखल केल्यांनंतर दिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, त्याचा राग म्हणूनच …

“The protestors are the beneficiaries of the Munde family. A case of Santosh Deshmukh murder was registered against the Munde family. Therefore, they have a grudge against me and a case has been registered against me because of their anger,” said Manoj Jarange.

by MHD

Published On: 

Manoj Jarange यांनी गुन्हा दाखल केल्यांनंतर दिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, त्याचा राग म्हणूनच …

Manoj Jarange । “जर संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबीयांच्या जिवाला धक्का लागला, तर धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” अशी जहरी टीका मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी परभणी येथे जनआक्रोश मोर्चात केली होती. या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

जोपर्यंत मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता. यानंतर तुकाराम आघाव यांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून जरांगे यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “बीड जिल्ह्यात मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध कधीच काही झालं नाही. पहिल्यांदाच त्यांच्या मनाविरुद्ध देशमुख हत्याकांडाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना त्यांचा खून पचवायचा होता. आम्ही मस्साजोगला बसून गुन्हा दाखल करून घेतला, असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Manoj Jarange claim Dhananjay Munde

“आंदोलन करणारे हे मुंडेंचे लाभार्थी आहेत. मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध संतोष देशमुख हत्याकांडाचा गुन्हा दाखल झाला. म्हणून यांची माझ्यावर नाराजी आहे आणि त्याचा राग म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, असा टोलाही जरांगे यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

 

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
byMHD

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही