Share

बावनकुळे, तू बावनकुळे तर आम्ही शहान्नवकुळी! मराठ्यांच्या नोंदींवरून मनोज जरांगेंचा थेट इशारा

सांगलीतील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याच्या प्रयत्नांवरून चंद्रशेखर बावनकुळे आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Published On: 

Manoj Jarange Patil addressing Maratha reservation rally in Sangli

मराठ्यांच्या नोंदींशी खेळण्याचा प्रयत्न होतोय का? असा संशय आता निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात राजकारण तापलं आहे. आरक्षणाच्या जनजागृतीसाठी जरांगे सध्या सांगली दौऱ्यावर आहेत. काल रात्री आटपाडीमध्ये त्यांची मोठी सभा पार पडली. या सभेला तुफान गर्दी होती. यावेळी त्यांनी मराठा नोंदी रद्द करण्याच्या मुद्द्यावरून तीव्र संताप व्यक्त केला.

तू बावनकुळे तर आम्ही शहान्नवकुळी: Manoj Jarange 

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला. “बावनकुळे, तू बावनकुळे आहेस. आम्ही शहान्नवकुळी मराठे आहोत.” असा टोला त्यांनी लगावला. लेकरांच्या भवितव्याशी खेळू नका. मराठ्यांचा दरारा दाखवून देऊ. असा कडक इशारा जरांगे यांनी दिला.

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही त्यांनी जोरदार टीका केली. कुणबी प्रमाणपत्रे आणि ओबीसीतून आरक्षण यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणी त्यांनी केली.

महसूल विभाग तुमच्याकडे आहे. म्हणून नोंदींशी खेळण्याचा अधिकार मिळतो का? असा थेट सवाल जरांगे यांनी विचारला. कोणाच्या आदेशाने हे सगळं सुरू आहे? हे आधी सांगा. मराठ्यांच्या हक्काच्या नोंदींवर हात टाकला तर हा डाव उधळून लावू. असा स्पष्ट संदेश जरांगे यांनी दिला आहे. भवानी विद्यालयाच्या मैदानावर तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत मोठी गर्दी होती. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी आटपाडीचं मैदान अक्षरशः दणाणून गेलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही