Share

‘इथेनॉल पेट्रोलमध्ये नव्हे, खड्ड्यांत टाका’; आदित्य ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरून इथेनॉलचा संदर्भ देत भाजप सरकार व कंत्राटदारांवर जोरदार टीका केली आहे.

Published On: 

Aditya Thackeray targets BJP over Pune roads

Aditya Thackeray on E20 : पुण्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजप (BJP) सरकारवर कडक टीका केली आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये त्यांनी इथेनॉल धोरणाचा संदर्भ देत रस्ते दुरुस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Pune Roads)

आपल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी उपरोधिकपणे म्हटले की, “कदाचित ह्या रस्त्यातही इथेनॉल मिसळलं असतं, तर काम लवकर पूर्ण झालं असतं! असा टोला त्यांनी सरकारला लगावला.

Aditya Thackeray targets BJP over Pune roads

“दरवर्षी भाजपची राजवट गणेशोत्सवापूर्वी डागडुजी आणि डिसेंबरपूर्वी रस्ता पूर्ण करण्याची थाप मारते. एक दशक झालं काम सुरू आहे! राजवटीचं इंजिन आणि कंत्राटदारांची यंत्रणा दोन्ही फुल्ल स्पीडमध्ये… पण खड्डे काही कमी होत नाहीत!” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केले आहे.

इथेनॉलच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा टोला लगावताना ते म्हणाले की, “इथेनॉल कशाला पेट्रोलमध्ये मिसळता? या खड्ड्यांत टाका… कदाचित ते तरी भरतील! नाहीतर कंत्राटदारांचे खिसेच अजून भरत राहतील!”

ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून, यामुळे पुणे आणि संपूर्ण राज्यातील रस्ते विकास प्रकल्पांवरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही