Chhagan Bhujbal | मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. पोलीस चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.या हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (Santosh Deshmukh murder case) या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव वारंवार येत असून ते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील आमदार, खासदार हे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत आहेत. विशेष म्हणजे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि नरेंद्र पाटील यांच्याकडून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. यावर ओबीसी नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन तुमचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. “मला मंत्री व्हायचं आहे, म्हणून कोणाचा तरी बळी घ्यावा, राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या स्वप्नातही येणार नाही”, असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी स्पष्ट केलं.
छगन भुजबळ म्हणाले, “जोपर्यंत नक्की होत नाही, ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची घाई का? त्यांनी राजीनामा का द्यावा आणि कुणी मागावा? साप साप म्हणून भुई थोपटणं योग्य नाही. कारण नसताना, काहीही सिद्ध झालेलं नसताना राजीनामा घेणं मी तेलगी प्रकरणात सोसलं आहे.”
महत्वाच्या बातम्या :