Sanjay Shirsat । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण (Santosh Deshmukh Murder) वेगळे वळण घेत आहे. याप्रकरणी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी काल पुण्यात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबतच सामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रकरणी आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे. “जर या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या घटनेच्या मागे, पुढे, पडद्यामागे आणखी कुठे जो असेल त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे, असं आश्वासन दिले आहे. त्याप्रमाणे कारवाई सुरु झाली आहे.”
Sanjay Shirsat on Dhananjay Munde
या प्रकरणामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तर कारवाई होईल. जर कदाचित मंत्री मुंडे यांचं नाव समोर आलं तर त्यांच्यावरदेखील योग्य ती कारवाई केली जाईल. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही,” असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :