Santosh Deshmukh । संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh murder) पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. आज या हत्याकांडातील आरोपी जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार याला न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. पावसकर यांच्या कोर्टात हजर केलं आहे. या प्रकरणात सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. (Santosh Deshmukh case)
संतोष देशमुख हत्येप्रकरणी 30 दिवस पोलिसांनी काय केलं? असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी केला आहे. तर आरोपींना जास्तीत जास्त कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. तसेच आरोपींना मोक्का लावता येतो का? याचा अभ्यास आम्ही करत आहे, अशी माहिती डीवायएसपी अनिल गुजर यांनी दिली.
“या प्रकरणात 51-52 कलम वाढवलं असून आता आम्हाला आरोपींची कोठडी वाढवून हवी आहे. कारण कृष्णा आंधळे अजून फरार आहे. त्याला कोणी मदत केली हे अटक केलेले आरोपीच सांगू शकतात. त्यामुळेच आम्हाला आरोपींची कोठडी वाढवून द्या,” अशी मागणी अनिल गुजर यांनी केली आहे.
Santosh Deshmukh case
दरम्यान, 9 डिसेंबर रोजी मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा गुन्हा देखील दाखल झाला. 11 तारखेला 29 तारखेला झालेल्या घटनेवरून खंडणीचा गुन्हा दाखल केला. पण वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि विष्णू चाटे यांच्यावर फक्त राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप विष्णू चाटेच्या वकिलाने केला.
महत्त्वाच्या बातम्या :