राजकीय हालचालींना वेग! Dhananjay Munde देणार राजीनामा? बंद दाराआड अजितदादांशी चर्चा सुरु

Today, all party leaders met the governor and demanded Munde’s resignation. In this way Dhananjay Munde has met Deputy Chief Minister Ajit Pawar. Discussions between these two leaders are going on behind closed doors.

by MHD

Published On: 

राजकीय हालचालींना वेग! Dhananjay Munde देणार राजीनामा? बंद दाराआड अजितदादांशी चर्चा सुरु

Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमुळे सध्या एक नाव चांगलेच चर्चेत येत असणारे नाव म्हणजे अजित पवार यांच्या गटाचे मंत्री धनंजय मुंडे. विरोधी पक्षनेत्यांसह महायुतीमधील काही नेते त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दिवसेंदिवस हे प्रकरण चांगलेच तापत चालले आहे. (Santosh Deshmukh murder update)

शिवाय आज सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच आता धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे. याप्रकरणी अजितदादा काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dhananjay Munde meet Ajit Pawar

दरम्यान आपण या प्रकरणात लक्ष घालू असं आश्वासन राज्यपालांनी सांगितले आहे. तसेच उद्या सर्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे, अशी देखील माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. त्यानंतर आता अजित पवार यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
byMHD

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही