Share

Dhananjay Munde राजीनामा देणार?; अजितदादांसोबतच्या बैठकीनंतर म्हणाले…

Dhananjay Munde राजीनामा देणार?; अजितदादांसोबतच्या बैठकीनंतर म्हणाले...

Dhananjay Munde । मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माईंड आहे असा आरोप केला जात आहे. तसंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे.

या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली. पण ही भेट नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे, असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं. आपल्याला मिळालेल्या खात्याचा अहवाल आपण अजितदादांसमोर ठेवला असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच या चर्चेमध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या :

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली. पण ही भेट नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे, असं धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी माध्यमांना सांगितलं.

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now