Share

“कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल”; अंजली दमानियांच्या आरोपांवर Chitra Wagh यांचं समर्थन

"कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल"; अंजली दमानियांच्या आरोपांवर Chitra Wagh यांचं समर्थन

Chitra Wagh । बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. राजकीय वर्तुळात देखील यामुळे खळबळ उडालेली पाहायला मिळतेय. हत्याप्रकरणातील सर्व आरोपी पकडले जावेत आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी अनेक मोर्चे आणि आंदोलनं सुरु आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये तळ ठोकला असून तेथील अनेक अनियमित कामांसंदर्भात सवाल उपस्थित केले आहेत.

काल पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा ( Pankaja Munde ) आणि धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. यावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी गुन्हे विभागाच्या सह पोलिस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली आहे.

अंजली दमानिया यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत कमेंट्स करणाऱ्या, त्यांना धमक्यांचे फोन करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सह पोलिस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली असल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.

विरोधक असो वा आणखीन कोणी इथे प्रत्येक स्त्रीचा सन्मान व्हायलाच हवा. नाहीतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि समस्त महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ तुम्हाला कायद्याचा आणि कायद्याने फटका देतील, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. “देवाभाऊंच्या समस्त बहिणींच्या वतीनं सांगतेय, कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी इशाराही दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पंकजा ( Pankaja Munde ) आणि धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्या म्हणाल्या “उच्च पदावरील माणसं फक्त परळीमधील का? असा सवाल मी अभ्यासपूर्वक केला होता. मी ट्वीटरवर दोन ट्विट्सही टाकले. भगवान बाबांसारखे संत होते, ते शैक्षिणिक, सांस्कृतिक प्रबोधन करायचे, ते नेहमी वंदनीय आहेत, मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही, आळशी आहे असं एका चकार शब्दाने म्हटलं नाही. पण त्यातील माझा उल्लेख काढून काही लोकांनी समाजातील सर्व लोकांना पाठवण्याचं काम केल्याने मला आता सातत्याने फोन येत आहेत.”

त्याचबरोबर फोननंबर फेसबूकवर टाकून अश्लील पोस्ट देखील टाकण्यात आल्या असल्याचं दमानिया यावेळी बोलताना म्हणाल्या. “नरेंद्र सांगळे यांचा काही वेळापूर्वी मला फोन आला होता. हा माणूस उठसूठ फोन करत सुटलाय. त्यांनी माझा फोननंबर फेसबूकवर टाकलाय. तसंच, काही पोस्ट केल्या असून खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. सुनील फड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्याचं दिसतंय. मला पहिल्या दिवशी ७०० ते ८०० फोन आले. आज चौथा दिवस आहे”, असंही त्यांनी म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या :

पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. यावर चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी गुन्हे विभागाच्या सह पोलिस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली आहे.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now