Santosh Deshmukh | संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh case) आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra awhad ) यांनी माध्यमांशी संवाद करत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केला आहे.
“मरणारा तर गेला, त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर या राज्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. देशमुख प्रकरणात माणुसकीची हत्या झाली असून त्यांना जाळून मारल आहे. आम्ही संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहे. तसेच 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा, अशी आव्हाड यांनी पुन्हा एकदा मागणी केली.
छगन भुजबळ यांनी या प्रकरणात मुंडे यांची पाठराखण केली आहे. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “भुजबळ यांच्यावर दबाव असू शकतो, पण महाराष्ट्राचं मत हे छगन भुजबळ यांच्या विरोधात आहे. कोण हा वाल्मिक कराड ज्याच्याकडे काय एवढं घबाड आहे, ज्यामुळे त्याला वाचवलं जातंय.”
“संतोष देशमुख यांच्या हत्येला आता एक महिना होईल. पण त्या घटनेच्या तपासात काय प्रगती आहे? मुख्यमंत्र्यांनी राजकारण बंद करून बीडच्या घटनेत योग्य ती कार्यवाही करावी. विष्णू चाटेला मुख्य आरोपी करायचे आणि प्रकरण थांबवायचं असं यांचं सुरु आहे”, असा आरोप जितेंद्र आव्हाड ( Jitendra awhad ) यांनी यावेळी बोलताना केला.
महत्वाच्या बातम्या :