“लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव, धनंजय मुंडे आणि Walmik Karad यांच्यामुळेच झाला”; मोठा गौप्यस्फोट!

पंकजा मुंडे यांचा पराभव हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या ( Walmik Karad ) दहशतीमुळे, त्यांच्या वागण्यामुळे झाला असा आरोप सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केला.

Published On: 

“लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव, धनंजय मुंडे आणि Walmik Karad यांच्यामुळेच झाला"; मोठा गौप्यस्फोट!

Walmik Karad । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण (Santosh Deshmukh Murder) वेगळे वळण घेत आहे. हे प्रकरण सुरेश धस यांनी चांगलंच लावून धरलं आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी माध्यमांशी बोलताना अजून एक मोठा दावा केला आहे.

पंकजा मुंडे यांचा पराभव हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या दहशतीमुळे, त्यांच्या वागण्यामुळे झाला असा आरोप सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केला. ते म्हणाले, “धनंजय मुंडे यांची परळीत दहशत नाही, पण वाल्मिक कराडची आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळे अनेकजण पंकजा मुंडेंवर नाराज झाले. त्याचा परिणाम हा लोकसभेच्या निवडणुकीत झाला.”

पुढे ते म्हणाले , “पंकजा मुंडे यांना माझ्या मतदारसंघातून 31 हजारांचे लीड मिळाले. परळीमधून 73 हजारांचे लीड मिळाले. पण एकट्या बीड तालुक्यातून त्या 98 हजारांनी मागे पडल्या. बजरंग सोनावणे लोकसभा निवडणुकीत निवडून आले. धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे फार चांगले मित्र होते. या दोघांच्या मैत्रीचं वाटोळं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलं. तेव्हापासून बजरंग सोनावणे विरोधात गेले, ते गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पडल्या नसत्या. ”

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही