Share

Santosh Deshmukh हत्येप्रकरणी आरोपींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने घेतला मोठा निर्णय

by MHD
Santosh Deshmukh हत्येप्रकरणी आरोपींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Santosh Deshmukh । सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh case) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलीस आरोपींकडून कसून चौकशी करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत. यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसह स्थानिक देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत.

याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. केज न्यायालयात आरोपींना हजर केले असता न्यायाधीश एस.व्ही. पावसकर यांनी विष्णू चाटे याच्या पोलिस कोठडीमध्ये 10 जानेवारीपर्यंत, तर इतर तीन आरोपींच्या कोठडीमध्ये 18 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Court extends custody

महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात आणखी तपास गरजेचा आहे, असे सांगत तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे वाढीव कोठडीची मागणी केली होती. विष्णू चाटे आणि इतरांनी वाल्मिक कराडशी (Walmik Karad) बोलणे करून दिले. त्यावरून कराडने खंडणी मागितली आणि त्यानंतर देशमुख यांची हत्या झाली. हे सगळे गुन्हे एकमेकांशी संबंधित असल्याने कोठडीत वाढ मिळावी, अशी मागणी तपास अधिकारी तसेच सरकारी वकिलांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या : 

Every day new revelations are coming out in Sarpanch Santosh Deshmukh murder case. The police are thoroughly interrogating the accused.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now