Ajit Pawar | संतोष देशमुख हत्याकांडावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. हाच मुद्दा उचलून धरत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. विरोधक सतत अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा मागत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बड्या नेत्याने ‘ॲक्सिडेंटल नेते’ म्हटले आहे.
“अजित पवार हे हतबल ॲक्सिडेंटल नेते आहेत. स्वत:च्या कर्तृत्वावर नाही तर भाजपच्या ईव्हीएमच्या कृपेने त्यांना निवडणुकीतमध्ये जागा मिळाल्या आहेत. ते जर महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणातील त्या मंत्र्याला आपल्या मंत्रीमंडळातून वगळलं असते,” असा टोला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले की, ” जर बीड पॅटर्न महाराष्ट्रात लागू झाला, तर प्रत्येक राज्यात हाच पॅटर्न लागू होऊ शकतो. असे झाले तर तुमच्या हातातून राज्य निसटून जाईल. त्याशिवाय, संपूर्ण बीड पोलीस खातं बरखास्त करून देशमुख हत्येचा खटला बीडच्या बाहेर चालवावा.”
Sanjay Raut claim Ajit Pawar
“बीडमध्ये लोकांना फसवण्याचा खेळ चालला आहे. त्यांच्या सरकारने आम्हा सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरूंगात डांबलं होते. त्यावेळी अजित पवार काही बोलले नाहीत. भाजप (BJP) ज्या पद्धतीने आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल,” असा दावाही यावेळी संजय राऊत यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :